दाऊदमुळे माझं करिअर संपलं | Ram Teri Ganga Maili Actress Mandakini | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 0

बोल्ड अभिनेत्री म्हणून मंदाकिनी चर्चेत होतीच. पण याचदरम्यान मंदाकिनीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जुळले होते. दाऊदच्या नावानेही बॉलिवूडचा थरकाप उडायचा. त्यामुळे बरेच दिग्दर्शक मंदाकिनीसह काम करण्यास उत्सुक नव्हते.एका मुलाखतीत मंदाकिनी यावर बोलली होती. 1994 मध्ये प्रकाशित दाऊदसोबतच्या त्या फोटोने माझे आयुष्य बदलून टाकले. माझा व दाऊदचा एक मुलगा आहे, असाही दावा केला गेला. पण यात काहीही तथ्य नाही. शोसाठी मी सर्रास दुबईला जायचे. अशाच एका शोमध्ये मी दाऊदला भेटले होते. पण आमच्यात काहीही नव्हते, असे ती म्हणाली होती.दाऊदसोबत नाव आल्याने मंदाकिनीला सिनेमे मिळेनासे झालेत आणि तिला फिल्मी करिअर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 1990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले. सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास आहे. येथे ती तिब्बती हर्बल सेंटर चालवते. दलाई लामा यांना ती फॉलो करते. याशिवाय ती योगाही शिकवते.
1991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला.

#LokmatNews #lokmatcnxfilmy #ramterigangameli
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber